Gautami Patil : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाटलं सगळं संपलं, आता थांबावं, मी गरीब घराण्यातील म्हणून… ; ‘त्या’ व्हिडीओवर गौतमी पाटील भावुक

Gautami Patil मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या वेबसाईट वरती तर आपण दररोज शेतकरी बांधवांसाठी नवनवीन बातमीचा आढावा घेत असताना आज एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण घेणार आहोत किती सुप्रसिद्ध लावणीस्तान गौतमी पाटील बद्दल गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील कमी कालावधीमध्ये वायरल झालेली एक कला सादर करणारी कलाकार आहेत आणि तिच्याबद्दल जो काही दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ वरती आता ती खूप भाव झालेली आहे आणि तिला असं वाटतंय ते आपल्या भावना मांडलेले आहेत त्या पाहूया.

Gautami Patil

Gautami Patil : कार्यक्रमाच्या बॅस्टेजच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला वाटलं आता सगळं संपलं… आता थांबावं, लोकांना आपली प्रगती बघवत नाही म्हणून मग ते या पातळीपर्यंत जातात याचा धक्का बसला अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) दिली. पण नंतर प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर पुन्हा उभी राहिली, महिला वर्गानेही सपोर्ट केला त्या सर्वांचे आभार मानते असं ती म्हणाली. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात गौतमी पाटीलने तिच्याशी संबंधित अनेक गोष्टींवर उत्तरं दिली.

Gautami Patil : माझ्यामागे कुणीही नाही, माझ्यासोबत कुणाचाही हात नाही म्हणून माझ्यावर टीका केली जाते असं सांगताना गौतमी पाटील भावुक झाली.

त्या व्हिडीओवर गौतमी पाटील भावुक

एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कपडे बदलताना गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला वाटलं होतं की आता थांबावं. मला अक्षरशः धक्का बसला होता. त्यावेळी मी घरात होते आणि प्रचंड घाबरले होते. त्यावेळी मी एकच विचार केला, सगळं संपलंय, आता थांबायचं. लोकांना आपली प्रगती बघवत नाही म्हणून लोक इथपर्यंत जातात का? पण मी थांबले तर त्यांच्या मनासारखं होणार, म्हणून मी नव्याने सुरूवात केली. समोरून मला रिस्पॉन्स कसा येईल, लोक काय बोलतील याची भीती वाटत होती. पण लोकांचे आभार, त्यांनी मला सांभाळून घेतलं. प्रेक्षकांनी साथ दिली नसती तर उभी राहू शकली नसते, महिला वर्गानेही सपोर्ट केला.

मी गरीब घराण्यातील म्हणून …

Gautami Patil : डान्सच्या कार्यक्रमावर होणाऱ्या टीकेवर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, कधी कधी वाटतं की मी गरीब घराण्यातील आहे, म्हणून माझ्यावर टीका केली जाते. मला कुणाचा पाठिंबा नाही, माझ्यासोबत कुणाचा हात नाही सोबत म्हणून या गोष्टींना सामोरं जावं लागतं असं वाटतं. ज्यावेळी माझ्याकडून चूक झाली त्यावेळी मी माफी मागितली, आता व्यवस्थित करते तरीही हे असं होतंय. माझ्यासारखे अनेक कलाकार सिनेमापर्यंत गेले आहेत. पण त्यांच्यावर कुठेही बोललं जात नाही. आपण पुढे चाललो म्हणून टीका, त्यामुळे कधीतरी वाटतं की, माझं कुणीच नाही, माझ्या मागे कुणीच नाही.

ज्यावेळी माझ्यावर कुणी टीका केली त्यावेळी मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. टीका करणारे लोक मोठे आहेत, मला राजकारण समजत नाही. मला आयोजक ज्या गाण्यावर डान्स करायला सांगतात त्यावर मी करते असं गौतमी पाटील म्हणाली.

गौतमी पाटील लग्न कधी करणार असं विचारल्यानंतर ती म्हणाली की, सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. पण मग माझ्याशी लग्न करणाऱ्या मुलाने माझ्यासोबत जे काही झालंय ते स्वीकारावं ही अपेक्षा आहे. मला अनेकांकडून लग्नासाठी मागणी घातली जातेय. एक मुलगा तर कार्यक्रमाच्या ठिकाणीच आला होता. माझ्या मॅनेजरशी बोलला, लग्नासाठी मागणी घालण्यासाठी आल्याचं त्याने सांगितलं.