MARATHA RESERVATION : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक! तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे मोर्चे, आंदोलने, उपोषणे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात सध्या चर्चेत असलेले नाव मनजे मनोज जरांगे पाटील! मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकार ला चाळीस दिवसाचा वेळ दिलेला आहे, त्यापूर्वी मराठा समाजाने काही गावामध्ये नेत्यांना बंदी केलेली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेते मंडळींना गावात प्रवेश नाही असे फलक प्रत्येक गावात लावण्यात आलेले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे ठामपणे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
MARATHA RESERVATION : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी! राज्यारात अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच गावागावांमध्ये नेत्यांना गावबंदी फलक लावलेले आहेत. ”चुलीत गेले नेते आणि पक्ष मराठा आरक्षण एकच लक्ष” असा मजकूर या फलकांवर लिहिण्यात आले आहेत. त्यावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो लावण्यात आलेला आहे.
मराठा आरक्षनाची मागणी करत राजकीय नेते मंडळीचा निषेधही केला आहे. मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकांवर ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावंची बंदी करण्यात आली आहे.
MARATHA RESERVATION : कोणत्या जिल्ह्यामध्ये किती गावांमध्ये नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि मतदानावर बहिष्कार टाकलाय पाहूया:
- जालन्यात २१५ गावात राजकीय नेत्यांना बंदी तर २५ गावाचा मतदानावर बहिष्कार.
- संभाजीनगर मध्ये 25 गावांमध्ये नेत्यांना बंदी करण्यात आली आहे 96 गावांनी मतदानावर बहिष्कार घातलाय.
- हिंगोली येथे 70 पेक्षा जास्त गावांचा मतदानावर बहिष्कार आहे.
- बीड जिल्ह्यात 93 गावात बंदी करण्यात आली आहे.
- नांदेड मध्ये ८८ गावात मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
- लातूर मध्ये 30 गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.
- लातूर मध्ये 30 गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.