THACKERAY VS SHINDE: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा! स्मृतीस्थळावर कडवट शिवसैनिकांचा रुद्रावतार… शिंदे गट आणि ठाकरे गट भिडले

ठाकरे गट व शिंदे गट यातील वाद तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे स्मृतिदिना दिवशी दसरा मैदानावर शिवसैनिकांमध्ये राडा झाला.

THACKERAY VS SHINDE: दादरच्या शिवाजी पार्क स्मृतीस्थळावर ठाकरे व शिंदे गटात राडा झाला.

THACKERAY VS SHINDE: आज बाळासाहेब ठाकरे यांचा अकरावा स्मृतिदिन आहे. दादरच्या शिवाजी पार्क वर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाजवळ शिवसैनिकांचा राडा… शिंदे व ठाकरे गट त्यांची एकमेकाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी झाली. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करून गेल्यानंतर हा राडा झाला ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिकांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी दोन्ही गटाला वेगवेगळ्या गेटमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही काळ इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यावेळी शिंदे गटाचे आमदार माजी महापौर नरेश  मस्के शितल म्हात्रे उपस्थित होते तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब हे उपस्थित होते.

THACKERAY VS SHINDE
THACKERAY VS SHINDE

THACKERAY VS SHINDE: ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊ सविस्तर

THACKERAY VS SHINDE: “ठाकरे गटाने शिंदे गटाविरुद्ध ‘चले जाव’ ‘चले जाव’ ‘गद्दार चले जाओ’ शिवसेना आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणा दिल्या. , हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर येण्याचा शिंदे गटाला काही अधिकार नाही शिवसेनेची गद्दारी करून सुरत, गोहाटी ला फिरून आलेल्याना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. हे लोक तिथे येणार असल्याचे कळल्यामुळे शिवसैनिकांनी घोषणा दिल्या असतील त्यात चुकीचे काय? असे आदित्य ठाकरे म्हणाले.

THACKERAY VS SHINDE: शिंदे गटाची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊ सविस्तर

THACKERAY VS SHINDE: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देणे हे आम्ही ऐकून घेणार नाहीत अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ असं शिंदे गटाकडून वक्तव्य करण्यात आले बाळासाहेबांचे विचार त्यांनी त्यागले व बाळासाहेबांचे संस्कार हे आज विसरले. या ठिकाणी बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी शिंदे साहेब आले असताना त्यांच्या विरोधात घोषणा देणे हे योग्य नाही.

अशाच अपडेट माहिती साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला लगेच जाॅईन व्हा ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv